नवी दिल्ली,
Financial benefits for ex-servicemen संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीच्या सणापूर्वी माजी सैनिकांसाठी मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांसाठी शिक्षण, विवाह व गरिबी अनुदानांची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून सुधारित दर लागू होतील. गरिबी अनुदानाची रक्कम महिन्याला ₹४,००० वरून ₹८,००० करण्यात आली आहे. या लाभाचा फायदा ६५ वर्षांपेक्षा वय असलेल्या, निवृत्तीवेतन नसलेल्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या विधवांना होईल.
शिक्षण अनुदानासाठी दोन अवलंबित मुलांसाठी किंवा दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरमहा ₹१,००० वरून ₹२,००० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विवाह अनुदान देखील प्रति लाभार्थी ₹५०,००० वरून ₹१ लाख करण्यात आले आहे. ही रक्कम दोन मुलींपर्यंत आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठी लागू होईल. सरकारने यासाठी अंदाजे २५७ कोटी रुपयांचा वार्षिक खर्च राखला आहे, जो सशस्त्र सेना ध्वज दिन निधीतून वितरीत केला जाईल. हा निर्णय माजी सैनिकांच्या सेवा आणि त्यागाची कदर करत त्यांच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देतो.