वर्धा,
general-elections-zilla-parishad जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ करिता आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. प्रारुप आरक्षणावर नागरिकांना हरकती व सूचना असल्यास १७ ऑटोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसिल कार्यालयात सादर करता येणार आहे.
जिप सदस्य पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पंस सदस्य पदासाठी संबंधित तालुयाच्या तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली असून आरक्षणाबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तहसिल कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. general-elections-zilla-parishad या अधिसूचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करावयाच्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित तहसील कार्यालयात १७ ऑटोबरपर्यंत सादर कराव्या, असे जिप, पंस व ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.