दिवाळीनिमित्त बस चालकांना ५,८५० रुपये बोनस!

उत्तर प्रदेश सरकारकडून भेट

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
लखनऊ,
Gift from the Uttar Pradesh government उत्तर प्रदेश सरकारने दिवाळी आणि सणांच्या काळात प्रवाशांसाठी खास तयारी करत, बस कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. सरकारने चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे. सरासरी ३०० किलोमीटर अंतर रोज कापणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज ४०० रुपयांचे भत्ते मिळतील, तर सलग १३ दिवस काम करणाऱ्यांसाठी हे ४,५८० रुपयांऐवजी ५,८५० रुपये रोज मिळणार आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना निर्धारित मायलेजपेक्षा जास्त काम केल्यास प्रति किलोमीटर ₹०.५५ अतिरिक्त मानधन देण्यात येईल.

Gift from the Uttar Pradesh government 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सूचनेनुसार, १८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान राज्यातील प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः लखनऊ, गोरखपूर, वाराणसी, अयोध्या, कानपूर, गाझियाबाद, मेरठ, मुरादाबाद, बरेली, सहारनपूर, आग्रा आणि अलीगडसारख्या प्रमुख मार्गांवर बस सेवा वाढवली जाईल.
 
 
परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंह यांनी सांगितले की, प्रोत्साहन कालावधीत बसांची संपूर्ण उपस्थिती सुनिश्चित केली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत अपुर्या बस सेवा चालवल्या जाणार नाहीत. व्यवस्थापकीय अधिकार्‍यांनी बस असेंब्ली, सुटे भाग आणि आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना सलग १२ दिवस काम केल्याबद्दल २,१०० रुपये, १३ दिवस काम केल्यास २,५०० रुपये एकवेळेचे प्रोत्साहन मिळेल. उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रादेशिक व्यवस्थापकांना १०,०००, सेवा व्यवस्थापकांना ५,००० आणि सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापकांना त्यांच्या बस सेवेनुसार अतिरिक्त भत्ते देण्यात येणार आहेत.