शिर्डी,
Golden umbrella for Sai Baba in Shirdi शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतात आणि त्यांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात. अशाच भाविकांपैकी चेन्नईचे जितेंद्र उमेडी यांनी साईबाबांच्या चरणी खास भेट दिली आहे. त्यांनी १८५ ग्रॅम शुद्ध सोन्याची मनमोहक मुलामा असलेली छत्री तसेच २३ लाख रुपयांचा धनादेश साई संस्थानकडे अर्पण केला.
साईभक्तांनी अर्पण केलेली ही सोन्याची छत्री समाधी मंदिरातील मूर्तीवर प्रतिष्ठापित करण्यात आली असून, ती साई मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरली आहे. भाविकांच्या अशा दानांमुळे साई संस्थानकडे रोख रक्कम तसेच सोन्याचे, चांदीचे अलंकार मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. शिर्डीच्या साईदरबारी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि हे दान त्यांच्यासाठी श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक ठरते.