नागपूर,
goon-arrested-with-weapon : काेयता हाती घेऊन दहशत पसरविणाऱ्या गुंडाच्या पाेलिसांनी मुसक्या बांधल्या. पाेलिस दिसताच ताे पळायला लागला. त्याचा पाठलाग करीत पाेलिसांनी ताब्यात घेतले.
नावेद अयूब शाह (24, समतानगर, विटाभट्टी चाैक) असे अटकेतील गुंडाचे नाव आहे. माहितीनुसार, कपिलनगर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना उन्नती काॅन्व्हेट जवळील रस्त्यावर नावेद हा गुंड हातात काेयता घेऊन िफरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पाेलिसांनी येथे पाहणी केली. पाेलिस आल्याचे दिसताच नावेद हा पळू लागला. पाठलाग करीत पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील काेयता पाेलिसांनी जप्त केला. नावेद हा गंभीर गुन्ह्याच्या बेतात शस्त्र घेऊन फिरत असल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी आराेपीविरूद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.