हॅमर्स रेस्टाॅरेन्ट अँड कॅफेवर पाेलिसांचा छापा

- अवैध हुक्का पार्लरवर कारवाई

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
police-raid : पाचपावली पाेलिसांनी हॅमर्स रेस्टाॅरेन्ट अँड कॅफेमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला. छाप्यात दाेन पार्लर चालकांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल करीत 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रंजीत सेवाग्राम काेचे (36, टेकानाका), जाॅन्टी साेलाेमन फिलिक्स (26, मार्टीननगर, जरीपटका) अशी आराेपींची नावे आहेत.
 
 
NGP
 
माहितीनुसार, अंबाझरी, बजाजनगर, सीताबर्डी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्क पार्लर माेठ्या प्रमाणात सुरु असतात. मात्र, आता त्याचे लाेन शहरभर पसरले आहे. कमाल चाैकात हॅमर्स रेस्टाॅरेन्ट अँड कॅफे हा चाैथ्या माळ्यावर आहे. या कॅेत हुक्का पार्लर चालविला जाताे, अशी गुप्त माहिती पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत यांना मिळाली. त्या आधारावर पाेलिसांनी या पार्लरवर मंगळवारी पहाटेपूर्वी छापा टाकला. यावेळी, कॅेत आराेपी रंजीत काेचे आणि जाॅन्टी फिलिक्स हे दाेघे ग्राहकांना प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का पदार्थ सेवनाकरिता पुरविताना सापडले. हे दाेघेही संगणमताने आर्थिक  फायद्याकरीता अवैधरित्या हुक्का पार्लर चालवित असल्याचे पाेलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले. यानंतर पाेलिसांनी या आराेपीच्या ताब्यातून हुक्का पाॅट, वेगवेगळे फफ्लेव्हरचे तंबाखू ईतर साहित्य असा 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.