रायसाेनी समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

माेहिनी काॅम्प्लेक्समधील कार्यालयात 12 तास झडती

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Income Tax raid : मुंबई येथील आयकर अधिकाऱ्यांनी नुकतीच नितीन खारा यांच्या काॅनि्फडन्स ग्रुप वर टाकलेली धाड पूर्ण हाेताच, शहरातील नामांकित रायसाेनी समूहाच्या एका कार्यालयावर आज मंगळवारी सकाळीच छापा घातला. तब्बल 12 तास चाललेल्या झडतीत आयकर विभागाने काही महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समाेर आली आहे.
 
 
 
RAID
 
 
 
कर चाेरी आणि आर्थिक अनियमितता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या प्राप्तिकर विभागाने सलग चाैथ्या दिवशी मंगळवारी शहरातल्या आणखी एका समुहावर छापा टाकत उलाढालीच्या व्यवहारांशी निगडीत कागदपत्रांची तपासणी केली. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी माेहिनी काॅम्प्लेक्समधील रायसाेनी शैक्षणिक समुहाच्या श्रद्धा हाऊसवर इमारतीतील श्रद्धा आर्टििफशियल इंटेलिजंस या कंपनीच्या कार्यालयावर हा छापा टाकला. पथकातल्या 5 ते 6 अधिकाऱ्यांचे पथक सकाळी सातच्या सुमारास कार्यालयात धडकले.
 
 
 
अधिकाèयांनी सलग 12 तास कागदपत्रांची तपासणी केली. रायसाेनी शैक्षणिक समूह मातृ संस्था असलेल्या या कंपनीच्या वार्षिक उलाढालीत आढळलेल्या त्रृटी आणि अनियमिततेमुळे आयकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली श्रद्धा एआय ही रायसाेनी समुहाची उपकंपनी आहे. कंपनीने सादर केलेल्या वार्षिक ताळेबंदात अनियमितता आढळल्याने ही आयकर विभागाने ही कारवाई केली असून पथकाने या संदर्भात काही कागदपत्रेही जप्त केल्याची माहिती मिळत आहे. एका आठवड्याच्या कालावधीत शहरातील दाेन माेठ्या उद्याेजकांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमुळे नागपूरमधील इतर करचुकवेगिरी करणाऱ्या उद्याेजकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.