इंस्टाग्राम फ्रेंडने केला तरुणीवर लैंगिक अत्याचार

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
instagram-friend-sexually-assaulted : इंस्टाग्रामवरुन ओळख झालेल्या एका तरुणाची नाेकरी करणाऱ्या एका तरुणीशी ओळख झाली. त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त तरुणीने कपीलनगर पाेलिस ठाण्यात लैंगिक शाेषण केल्याची तक्रार दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन आराेपीला अटक केली. प्रशांत अनिल मराठे (वय 28, रा. नविन कामठी, नागपूर) असे आराेपीचे नाव आहे.
 
 
 
NGP
 
 
 
आराेपी प्रशांत मराठे याचे कपीलनगरात ‘म्युझिक शाॅप’ आहे. ताे नेहमी इंस्टाग्रामवर रिल्स पाेस्ट करीत असताे. इंस्टाग्रामवरुन पीडित 26 वर्षीय तरुणी संजना (काल्पनिक नाव) हिची ओळख झाली. त्यावर चॅटिंग करीत दाेघांमध्ये मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. बèयाच दिवसांपर्यंत दाेघांच्या भेटी-गाठी हाेत गेल्या. 29 एप्रिल 2025 राेजी सायंकाळी पाच वाजता प्रशांतने संजनाला भेटायला बाेलावले. दाेघांनी काही वेळ फुटाळा तलावावर घातल्यानंतर त्याने कपीलनगरातील दुकानात नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, संजनाने त्याला नकार दिला.
 
 
त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वांरवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लग्न करण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. 13 ऑक्टाेबर 2025 राेजी संजनाने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, प्रशांतने लग्न करण्यास थेट नकार देऊन तिला शिवीगाळ करुन हाकलून दिले. संजनाने थेट कपीलनगर पाेलिस ठाणे गाठले. ठाणेदार सतीश आडे यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक सुप्रीया गजरे यांनी तिच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करीत आराेपीला अटक केली. आराेपीला 15 ऑक्टाेबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.