२० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, केंद्र सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
राजस्थान,
Jaisalmer Jodhpur highway bus accident  राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात २० प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. एका खासगी एसी बसला अचानक आग लागल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीची तीव्रता इतकी होती की काही प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत आणखी १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Jaisalmer Jodhpur highway bus accident 
ही खासगी बस Jaisalmer Jodhpur highway bus accident  जैसलमेरहून जोधपूरकडे जात होती. प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये सकाळच्या सुमारास अचानक धूर आणि आग लागली. चालकाने तातडीने बस थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आगीने इतक्या वेगाने बसला व्यापले की काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. घटनास्थळावर पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण देशात शोकाची लाट पसरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, जैसलमेरमध्ये बसमध्ये लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत पीडादायक आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती मी गहिरा शोक व्यक्त करते आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करते.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी Jaisalmer Jodhpur highway bus accident  यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत PMNRF (पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी) मधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना पन्नास हजार रुपये दिले जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्यात सहभागी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार पीडितांच्या मदतीसाठी वचनबद्ध आहे आणि जखमींवर मोफत व दर्जेदार उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे.
 
 
 
या अपघातानंतर Jaisalmer Jodhpur highway bus accident  खासगी बससेवा आणि वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तांत्रिक दोषामुळे ही आग लागली का, याचा तपास पोलिस आणि फॉरेन्सिक विभाग करत आहे. सुरक्षाव्यवस्था, अग्निशमन उपकरणांची अनुपलब्धता आणि चालक-कर्मचाऱ्यांचे अपयश या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.राज्यातील आणि देशातील विविध स्तरांतील नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. हा अपघात प्रशासनासाठी एक गंभीर इशारा असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.