४०९ पैकी ३५९ तक्रारी ‘ऑन दी स्पॉट’ निकाली

आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत महाराजस्व समाधान शिबीर

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
तळेगाव, 
maharajswa-samadhan-camp मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तळेगाव (शा.पंत) येथे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे नियोजन आ. सुमित वानखेडे यांनी केले आहे. शिबिरात नागरिकांच्या विविध शासकीय विभागातील तक्रारी आणि मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. ४०९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३५९ अर्ज तात्काळ निकाली काढण्यात आले. उर्वरित ६० प्रकरणे निर्धारित वेळेत सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले असल्याची माहिती आ. वानखेडे यांनी दिली.
 

maharajswa-samadhan-camp 
 
शिबिरात उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, शेती पांदन रस्ते, घरकुल समस्या अशा विविध विषयांवरील नागरिकांच्या अडचणींवर जागेवरच निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात आला. या शिबिरात तहसीलदार ऐश्वर्या गिरी, पंचायत समिती अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, नैसर्गिक आपत्ती विभाग, समाजकल्याण विभाग, पशुधन विभाग, महा ऑनलाईन केंद्र यांसह तालुका व जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. maharajswa-samadhan-camp यावेळी आ. सुमित वानखेडे म्हणाले की, या उपक्रमाचा उद्देश फत तक्रारी नोंदविण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या समस्यांचे प्रत्यक्ष समाधान देणे हा आहे. नागरिकांच्या चेहर्‍यावरचे समाधानच आमच्यासाठी सर्वात मोठे यश असल्याचे ते म्हणाले. यशस्वीतेसाठी भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष सचिन होले यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आमदार आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांच्या अडचणींना थेट व तत्काळ प्रतिसाद देण्याचा लोकाभिमुख उपक्रम यशस्वी ठरला आहे.