अनिल कांबळे
नागपूर,
Molestation of a minor girl : अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅटवरून ओळख झाल्यानंतर युवकाने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिचे अश्लील फोटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आराेपी युवकास तीन वर्षांची शिक्षा ठाेठावली. ही शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी सुनावली. संदीप उफर् गिरीधर काशीराम यादव (19, रा. अजनी), असे शिक्षा झालेल्या आराेपीचे नाव आहे.
अजनी हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय फिर्यादी मुलीसाेबत आराेपीने स्नॅपचॅटद्वारे ओळख करून माेबाइलवर संपर्क साधला. तिच्याशी चॅटिंग करुन तिला जाळ्यात ओढले. आराेपीने ऑगस्ट 2023 ते 29 मार्च 2024 यादरम्यान फिर्यादीला छाेट्या कपड्यावरील फोटाेची मागणी केली. त्यामुळे तिने काही फोटाे त्याला पाठवले. त्यानंतर त्याने तेच फोटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच अजनी हद्दीत तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग करून तिला पाहून घेण्याची धमकी दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपीला 12 एप्रिल 2024 राेजी अटक केली हाेती.
तपास अधिकारी व तत्कालीन सहाय्यक पाेलीस निरीक्षक सचिन निंबाळकर यांनी न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले हाेते. न्यायधीश ग्वालानी यांनी साक्षीपुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने आराेपीला कलम 8, 12 पाेक्साे अन्वये तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधा कारावास तसेच भादंविच्या कलम 506 अन्वये एक वर्ष कारावास व हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास, अशी शिक्षा ठाेठावली. पैरवी अधिकारी म्हणून किर्ती फुकट, सुरेंद्र लव्हाळे यांनी न्यायालयाला सहकार्य केले. सरकारर्ते अॅड. दीपिका गवळी यांनी बाजू मांडली.