मुंबई,
Parineeti Chopra बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा यांच्यातील मैत्रीचा एक सुंदर क्षण अलीकडेच चाहत्यांच्या नजरेस पडला. दोघींनी जवळपास एकाच काळात आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि तेव्हापासून त्यांच्यात एक घनिष्ठ नातं निर्माण झालं आहे. सध्या आई होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या परिणीतीला आधीच मातृत्वाचा अनुभव घेणाऱ्या आलियाने एक खास भेटवस्तू पाठवली असून, परिणीतीने ती सोशल मीडियावर शेअर करत आलियाचे मनापासून आभार मानले आहेत.
परिणीती चोप्राने Parineeti Chopra आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आलियाने दिलेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. आलियाने तिच्या स्वतःच्या ‘एड-ए-मम्मा’ (Ed-a-Mamma) या ब्रँडचा एक खास हॅम्पर परिणीतीसाठी पाठवला आहे. हा ब्रँड मुख्यत्वेकरून बाळंतीण मातांसाठी तसेच लहान मुलांच्या देखभाल व गरजांवर लक्ष केंद्रित करतो. परिणीतीने हसत-हसत या भेटीसाठी “शुक्रिया, मम्मा!” असे कॅप्शन देत आपला आनंद व्यक्त केला.यापूर्वी ऑगस्ट महिन्यात परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढा यांनी त्यांच्या पालक होण्याच्या बातमीची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी ‘1+1=3’ असं मजकूर असलेल्या केकसह एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये एका नवजात बाळाचे पाय देखील दिसत होते. त्यानंतर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ही जोडपी एकत्र पार्कमध्ये फिरताना दिसून आली होती, जेथून त्यांचा कौटुंबिक प्रवास आता सुरू होणार आहे हे स्पष्ट होत होतं.
या घोषणेनंतर Parineeti Chopra बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या कपलला शुभेच्छा दिल्या होत्या. सोनम कपूर, हुमा कुरैशी, रकुल प्रीत सिंह, भूमि पेडणेकर, नेहा धूपिया, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि कलाकारांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या.आलिया भट्टने दिलेल्या या सोज्वळ भेटीने केवळ परिणीतीच नव्हे, तर चाहत्यांच्या मनालाही स्पर्श केला आहे. सोशल मीडियावरही यावर उत्स्फूर्त प्रतिसाद उमटताना दिसतोय. आलिया आणि परिणीती यांच्यातील ही मैत्री आणि परस्पर प्रेम, बॉलीवूडमधील एक हृदयस्पर्शी उदाहरण म्हणून समोर येत आहे.