नवी दिल्ली,
south-asian-university पश्चिम बंगालमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर आता राजधानी दिल्लीतील साऊथ एशियन विद्यापीठातही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाच्या परिसरात एका विद्यार्थिनीवर सुरक्षारक्षक, दोन विद्यार्थी आणि एका अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ ऑक्टोबरच्या सायंकाळी घडली. पीडिता सायंकाळी सुमारे आठ वाजता मेस हॉलकडे जात असताना बांधकामाधीन इमारतीजवळ बसलेली होती. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने कोणालातरी बोलावले. काही वेळातच एक मध्यमवयीन व्यक्ती आणि दोन विद्यार्थी घटनास्थळी पोहोचले. south-asian-university आरोपींनी विद्यार्थिनीला पकडले, तिचे जॅकेट काढण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्तीने तिला वरच्या मजल्यावरील रिकाम्या खोलीत ओढून नेले. तिला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळी देण्यात आली आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
दरम्यान, मेस कर्मचारी वाहनासह घटनास्थळी पोहोचल्याने चारही आरोपी पळून गेले आणि विद्यार्थिनीचा जीव वाचला. घटनेनंतर ती मानसिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेत सापडली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अत्याचारापूर्वीच विद्यापीठातील एक विद्यार्थी आर्यन यश सोशल मीडियावर आणि ई-मेलद्वारे तिला अश्लील व धमकीचे संदेश पाठवत होता. south-asian-university हा प्रकार तिने जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केला आहे. या घटनेनंतर दोन दिवसांपर्यंत पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही आणि वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. अखेर ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवला. घटनेची माहिती वसतिगृह प्रमुखांना रात्रीच देण्यात आली होती, तरीही त्यांनी विद्यार्थिनीला तत्काळ मदत करण्याऐवजी सकाळी येण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या निष्काळजीपणामुळे विद्यापीठ प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणानंतर दिल्लीसह देशभरातील विद्यापीठांमध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा तीव्रतेने चर्चेत आला आहे.