सेलू,
rashtriya-swayamsevak-sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेलू शाखेच्या वतीने विजयादशमी उत्सव रविवार १२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वते म्हणून विदर्भ प्रांत घोष प्रमुख श्रीनिवास बेडेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून येथील सेवानिवृत्त शिक्षक पारसराम गोमासे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्ती, शिस्त व सामाजिक बांधिलकी यांची प्रेरणास्थान संस्था आहे. समाजातील प्रत्येक घटकाला संघकार्याशी जोडून राष्ट्रनिर्मितीची दिशा देण्याचे आवाहन केले. rashtriya-swayamsevak-sangh प्रास्ताविक व आभार तालुका कार्यवाहक कृष्णा कावळे यांनी केले. उत्सवापूर्वी सायंकाळी ५ वाजता शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. पथसंचलनाचे स्वागत शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले. या प्रसंगी विनोद बेदरकर, अमृतलाल व्यास, शिवा डुकरे, पवन राठी, आदी उपस्थित होते.