वर्धा,
sai-mandir-wardha शिर्डीतील साईबाबांच्या मूळ पादुका आज वर्धेतील साई मंदिरात पोहोचल्या. वंजारी चौकातून साई मंदिरपर्यंत अश्व, भजनी दिंड्या, लेझीम, मंगल वाद्यासह पालखी व पादुका शोभायात्रेतून साई मंदिरात आणण्यात आल्या. रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. पादुकासोबत शिर्डी साई संस्थाचे मुख्य गुरुजी तसेच २१ जणांचा ताफा आहे. दुपारी १२ वाजता मध्यांन्ह आरती शिर्डीच्या साई मंदिरात करण्यात येथे त्या पद्धतीने करण्यात आल्याने वर्धेत शिर्डी अवतरल्याचा भास होत होता. दिवसभर हजारो भाविकांनी साई बाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
साईभतांच्या आग्रहास्तव शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्रींच्या मूळ पादुका दर्शनासाठी विदर्भात फिरवल्या जात आहे. आज बुधवार १५ रोजी साई बाबांच्या पादुका वर्धेत दाखल झाल्या. वंजारी चौक ते साई मंदिरपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. साई मंदिरात बाबांच्या पादुकांचे जोरदार स्वागत झाले. साईबाबांनी वापरलेल्या पादुका शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तांच्या अधिनस्त आहेत. या पादुकांचे विदर्भातील साईभतांना दर्शन घेता यावे, याकरिता विदर्भात श्रींच्या मूळ पादुका फिरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे १५ ऑटोबर १९७५ साली पहिल्यांदा वर्धेत पादुका आल्या होत्या. sai-mandir-wardha चौथ्यांदा आलेल्या पादुकाही १५ ऑटोबर रोजी आल्या वर्धेकरांच्या दर्शनाकरिता आल्या. सन १९७८ आणि २०२१ मध्ये सुद्ध साईबाबांच्या पादुका साई मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. पादुकांसोबत शिर्डी संस्थानचे पुजारी, भालदार, चोपदार व सुरक्षा कर्मचारी अशा २२ लोकांची चमू असुन साईबाबांची माध्यान्हं व सांज आरती शिर्डी देवस्थानमध्ये होते त्याच पद्धतीने झाली. श्री साई सेवा मंडळ व श्री साई भत परिवार वर्धाच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भतांची गैरसोय टाळण्यासाठी ५० ते ६० स्वयंसेवकांची चमू तयार होती.
खासदार अमर काळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, संत सयाजी महाराज, मयूर महाराज, बाळासाहेब पावडे, अॅड. परमानंद टावरी, सुधीर पांगुळ यांच्यासह हजारो भतांनी पादुकांचे दर्शन घेतले. यशस्वीकरिता नत्थुजी कुबडे, विठ्ठल व्यवहारे, घनश्याम सावळकर, सुभाष राठी, चंद्रशेखर राठी, श्रीकांत गांधी, विजय बोबडे, अशोक झिल्पे, टिपन्ना भंडारी, सुधाकर कापसे, संजय पोफळी, विजय ठकरे, निधी राठी, शोभा गांधी, शशी राठी, रेखा बोबडे, कल्पना गावंडे, गायश्री पोफळी, मनीषा जंगतवार आदींनी परिश्रम घेतले.