सैनिक कल्याण विभागात लिपिकांची ७२ पदे भरणार

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
यवतमाळ :
सैनिक कल्याण विभागातर्फे माजी सैनिकांमधून लिपिक, टंकलेखकांची ७२ पदे भरण्यात येत असून, ५ नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या Soldier Clerk Recruitment भरतीसाठी केवळ माजी सैनिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रकि‘या टीसीएस-आयओएन होणार आहे.
 
 
Lipik
 
Soldier Clerk Recruitmentअर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी २३.५९ पर्यंत सादर करावेत. जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.