अमेरिका,
China tariff war अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर आता अधिक तीव्र आणि आक्रमक होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत चीनने अमेरिकेविरुद्ध केलेल्या आर्थिक निर्णयांनी व्यापार युद्धाची नवी उंची गाठली आहे. चीनने अचानक अमेरिकेला देण्यात येणाऱ्या रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवली होती, ज्यामुळे अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात सापडला, कारण रेअर अर्थ मिनिरल्ससाठी अमेरिका पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या विविध उद्योगांवर गंभीर परिणाम झाले.
या घडामोडींवरच चीनने पुढील महत्त्वाचा निर्णय घेतला, ते म्हणजे अमेरिकेतून होणारी सोयाबीनची आयात अचानक बंद केली. चीन हा अमेरिकेतील सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार असताना या आयात थांबविल्यामुळे अमेरिकन शेतकरी आणि बाजारपेठ गंभीर संकटात सापडले आहेत. सोयाबीन बाजारात आलेल्या धक्क्यामुळे अमेरिकेतील शेती उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.
चीनच्या China tariff war या धोरणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खूपच संतप्त झाले. त्यांनी या प्रकरणावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, चीनवर तब्बल १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. येत्या नोव्हेंबरपासून अमेरिकेत चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. ही घोषणा जागतिक व्यापार विश्वात मोठी हलचाल ठरली आहे.ट्रम्प यांनी नुकतीच आणखी एक गंभीर घोषणा केली आहे, ज्यामुळे चीन आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर चीनने सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू केली नाही तर अमेरिकेने चीनकडून होणाऱ्या खाद्य तेलाच्या आयातवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. या घोषणेनंतर चीनच्या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे, कारण चीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्य तेलाच्या गरजेतील जवळपास ४३ टक्के आयात अमेरिकेकडूनच होते.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, चीन जाणूनबुजून अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी न करता त्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकत आहे. हे आर्थिक आणि व्यापारी शत्रूत्व वाढवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून अमेरिकाही चीनविरोधात कठोर निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे.या टॅरिफ युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढत आहे आणि दोन्ही महाशक्तींच्या आर्थिक धोरणांवर जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम होण्याची भीती आहे. पुढील काळात या वादविवादाचा कसा परिणाम होतो याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.