नवी दिल्ली,
Virtual Hearing Lawyer Video दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीपूर्वी घडलेला एक धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. प्राप्त व्हिडिओत कोर्टाच्या गणवेशातील एका वकिलाला सुनावणी सुरू होण्यापूर्वी एका महिलेला ओढून तिच्या ओठांवर चुंबन करताना दिसते. माहितीनुसार, हा प्रसंग न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी घडला होता, जेव्हा न्यायाधीश अद्याप हजर नव्हते. सर्व वकील आणि उपस्थित व्यक्ती ऑनलाइन लॉगिन करत होत्या.
व्हिडिओमध्ये वकिल आपल्या खोलीत बसलेला असून त्याच्यासमोर साडी परिधान केलेली महिला येते. अचानक वकिल तिला जवळ खेचतो आणि काही क्षण तिला चुंबन घेतल्याचे दिसते. महिला थोडी अस्वस्थ झाली आणि लगेच मागे सरकली. हा संपूर्ण प्रकार व्हर्च्युअल लाईव्ह कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. नेटिझन्सकडून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांनी वकिलाच्या या वर्तनाचा निषेध केला आहे आणि न्यायालयीन प्रतिष्ठेचा भंग झाल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. घटनेनंतर न्यायालयीन वकिल समाजात या प्रकाराला गंभीर दृष्टीने पाहण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.