मुलांनी साकारली पुस्तक प्रतिमा
यवतमाळ,
Vivekananda Vidyalaya Yavatmal येथील विवेकानंद विद्यालयात १५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, मिसाईलमॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस अर्थात् वाचन प्रेरणा दिन मुलांनी पुस्तकाची प्रतिकृती साकारून अनोख्या पद्धतीने साजरा केला. हे अभिनव पुस्तक साकारण्यासाठी मुले ठरवून दोन प्रकारच्या गणवेशात शाळेत उपस्थित झाली. पांढरा शर्ट व खाकी या गणवेशातील मुलांनी पुस्तकाचे पान तयार केले तर हिरव्या रंगाच्या क्रीडावेशातील मुलांनी त्याचे कव्हर तयार केले. मुलींनीही त्याला साजेशी किनार तयार करून पुस्तकाचा आकार दिला.
Vivekananda Vidyalaya Yavatmal शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे व पर्यवेक्षक विवेक अलोणी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जया बेहेरे यांनी विवेकानंद, सरस्वती व डॉ. कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पार्चन केले. वाचनाचे महत्त्व सांगणार्या घोषवाक्यांची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क‘मांक : गौरी जीवन पवार, द्वितीय : अंकिता प्रमोद हेमणे, तृतीय : गुंजन सचिन पापडकर व जान्हवी सागर पाटणकर आणि प्रोत्साहनपर क्रमांक : लोचन उपेश भाले या मुलांनी पटकावला. त्यांना प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. प्रीती चौधरी यांनी स्पर्धेतील घोषवाक्य परीक्षण केले. त्याचवेळी विद्यार्थ्यांनी ठरावीक वेळपर्यंत पुस्तकाचे वाचन करून वाचनानंद मिळविला.
याप्रसंगी Vivekananda Vidyalaya Yavatmal शाळेतील शिक्षक विवेक कवठेकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी स्वत:ला वाचनाची सवय जडावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या कार्यक‘मासाठी निलेश पत्तेवार, प्रवीण जिरापुरे, चंद्रकांत मडपाके, वैशाली ठाकरे, सोनाली पडलवार, प्रफुल्ल गावंडे, गहरवार, हेरंब पुंड, मन्साराम सावलकर, महेश कोकसे, आशिष दंडावार, संतोष पवार, संजय येवतकर, अनुपमा दीक्षित, पूर्णाजी खानोदे, पूनम नैताम, भारती सरोदे, राजश्री गुंठ्ठे यांनी परिश्रम घेतले.