तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
hunger-strike-mumbai : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या लिपिक, लेखा व परिचर संवर्गाच्या अत्यंत ज्वलंत मागण्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईच्या आझाद मैदानात बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
या सर्व बाबींवर विचार करण्यासाठी राज्य संघटनेची राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. त्यात प्रमुख प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन, शासनाच्या याकडे हेतुतः दुर्लक्ष करीत असल्याबद्दल कर्मचाèयांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिप लिपिकवर्गीय कर्मचाèयांच्या वेतन त्रुटीबाबत या आदेलनांच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय न घेतल्यास यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याबाबत संघटनेच्यावतीने भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी अनेकदा प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊनसुद्धा शासनाने महत्वपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत. या आंदोलनात यवतमाळ येथील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष दिलीप कुडमेथे यांच्या नेतृत्वात उपोषणात सहभागी होत आहेत. यात संजय गांवडे, सुरेश राठोड, संदीप भोयर, प्रवीण टेके, देवानंद वाघमारे, प्रवीण खंडरे, सचिन पानोडे, प्रफुल दातीर, सचिन बोपटे, हनुमान मेश्राम, रूपेश पेंदोर, गणेश मुत्तेलवार यांचा समावेश आहे.