'मुझे माफ करना'... राजकीय नेत्याची भावनिक संन्यासाची घोषणा Video

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |

बिहार,

Abhay Kumar Singh बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपात राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजप, जेडीयू तसेच लहान पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असताना, अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना धक्का बसत आहे. याच संदर्भात लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे नेते अभय कुमार सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते उमेदवारी न मिळाल्याने फूटफूटून रडताना दिसत असून, भावनिक आवेशात राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करताना दिसत आहेत.
 
 

Abhay Kumar Singh  
समस्तीपूर Abhay Kumar Singh जिल्ह्यातील मोरवा विधानसभा मतदारसंघातून अभय सिंह यांची उमेदवारीची जोरदार चर्चा होती. २०२० मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून एलजेपी (रामविलास) चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यंदाही त्यांनी उमेदवारीची तयारी केली होती. मात्र, एनडीए आघाडीच्या अंतर्गत जागा वाटपात मोरवा आणि रोसडा या दोन जागा सुरुवातीला एलजेपी (रामविलास) च्या वाट्याला आल्या. परंतु नंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नाराजीमुळे मोरवा मतदारसंघ जेडीयूला देण्यात आला आणि तेथून माजी आमदार विद्यासागर निषाद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
 
 
 
ही घोषणा झाल्यानंतर अभय सिंह यांनी आपली निराशा आणि संताप व्यक्त करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केला की, "माझ्यापेक्षा अधिक पैशांची देवाणघेवाण केल्याने दुसऱ्याला तिकीट देण्यात आले. त्यामुळे आता माझ्या राजकीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे. मी आता राजकारणातून संन्यास घेत आहे." ते रडत रडत बोलताना दिसत असून, हा व्हिडिओ पाहून अनेकांना भावना अनावर झाल्या.
 
 
 
 
या प्रकारामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तिकीटवाटपात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अभय सिंह यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. एलजेपी (रामविलास) पक्षाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.दरम्यान, मतदारसंघात अभय सिंह यांचे काहीसे स्थान असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, या घटनेचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.