अमरावती,
burden-of-40-apps-on-teachers राज्यातील विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली तर शिक्षक सुमारे ४० विविध शासकीय अॅप्सच्या ओझ्याखाली दबले आहेत. दररोज शिक्षकांना विविध ऑनलाईन अॅप्स, लिंक, अहवाल, प्रशिक्षण आणि सर्वेक्षण यामध्ये व्यस्त राहावे लागत आहे. हे सर्व ऑप एकत्र करून शिक्षक मैत्रीणपूर्ण डिजिटल प्रणाली निर्माण करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.

सध्या ४० अॅप शिक्षक वापरत आहे. त्यामुळे मोबाईल हँग होत आहे. या सर्व अॅप्सवर शिक्षकांना दररोज हजेरी, विद्यार्थ्यांचे अहवाल, सर्वेक्षण, प्रशिक्षण, आणि विविध शासकीय माहिती अनिवार्यपणे भरावी लागते. तसेच विविध व्हॉट्सअॅप गटांवरून २४ तास आदेश व लिंक येतात. परिणामी शिक्षकांचा अध्यापनासाठीचा वेळ अत्यल्प उरतो. ही परिस्थिती भारतीय संविधानातील कलम २१अ नुसार शिक्षणाचा अधिकार तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्देशांशी विसंगत आहे. शिक्षकांचे मूळ कार्य म्हणजे अध्यापन, परंतु तांत्रिक आणि प्रशासकीय कामांमुळे हे कार्य प्रभावित होत आहे. burden-of-40-apps-on-teachers हे सर्व अॅप्स एकत्र करून एक अॅप तयार करावा, ऑनलाईन अहवालांची संख्या मर्यादित ठेवावी, शाळांमध्ये डिजिटल डेटा एंट्री सहाय्यक पद निर्माण करावे, इंटरनेट नसताना माहिती सेव्ह करून नंतर अपलोड करता येईल, अशी ऑफलाईन सुविधा द्यावी, व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावरून आदेश देणे थांबिण्यात यावे, शिक्षकांच्या अध्यापन वेळेचे संरक्षण करणारी डिजिटल कार्य प्रणाली शासनाने विकसित करावी, केंद्र शाळा आणि प्रत्येक माध्यमिक शाळेवर ऑनलाईन कामाकरिता संगणक प्रणाली उपलब्ध करावी, तसेच याकरिता कंत्राटी संगणक ऑपरेटरची नेमणूक करावी, अश्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.