देवळी,
cctv-cameras-forensic-van-in-deoli गृह विभाग व जिल्हा पोलिस दलाच्या वतीने देवळी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा व फिर्यादीस मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम तसेच पोलिस दलाला प्राप्त फॉरेन्सिक व्हॅन आणि बसेस हस्तांतरण कार्यक्रम पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल.

यावेळी खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, जिल्हधिकारी वान्मथी सी., जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार १७ रोजी दुपारी १ वाजता स्थानिक पोलिस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी ना. भोयर यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे वर्धा शहर पोलिस ठाण्याची इमारत, पोलिस मुख्यालय येथे २०० निवासस्थाने तयार करण्यात आली आहे. cctv-cameras-forensic-van-in-deoli हिंगणघाट पोलिस ठाणे व उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या इमरातीसाठी ६.६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अला आहे. आर्वी पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी ६.६८ कोटी, पुलगाव पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांच्यासाठी निवासस्थानाची निर्मिती, कारंजा व आष्टी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थान तयार करण्यात येत आहे. ना. भोयर यांनी गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा सक्षम करण्यासाठी खास प्रयत्न केले. वर्धा व हिंगणघाट शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याशिवाय देवळी शहरासह पुलगाव, आर्वी येथील सीसीटीव्ही कॅमेरासाठी मान्यता देण्यात आली आहे. नावीण्यपूर्ण योजनेंर्गत स्मार्ट पोलिसिंगसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांना गतीमान करण्यासाठी नवीन चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन फॉरेसिंग लॅब, सायबर सियुरिटी लॅबसाठी देखील ना. भोयर यांनी पुढाकार घेतला आहे.