नागपूर,
Dharampeth College Nagpur धरमपेठ शिक्षण संस्थेच्या आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात आज १६ ऑक्टोबर रोजी भाषा विभागाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून रामदेव बाबा महाविद्यालयाच्या प्रा. आरुषी वालगावकर आणि धनवटे महाविद्यालयाच्या प्रा. श्रीया ओक उपस्थित होत्या.

स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी रस्किन बॉन्ड, ओ. हेन्री, अण्णा भाऊ साठे, सुधा मूर्ती, मुन्शी प्रेमचंद यांच्या कथा सादर केल्या. यातील पुरस्कार विजेते आहेत, Dharampeth College Nagpurप्रथम: सारा वर्गिस (एल.ए.डी. महाविद्यालय),द्वितीय: नेहा पुकाले (गुल्हाने महाविद्यालय),तृतीय (संयुक्त) जीया रामपुरीया (रामदेव बाबा महाविद्यालय) व सजल उके (आंबेडकर महाविद्यालय)स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, आत्मविश्वास आणि कथाकथनाचे कौशल्य वाढवणे हा होता.कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. विशाखा जोशी, उपप्राचार्या डॉ. मंजुश्री सरदेशपांडे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. मंगेश पाठक व मराठी विभागप्रमुख डॉ. जीवनतारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन नीति पालीवाल, तर आभार प्रदर्शन टेनिशा हिने केले.
सौजन्य:दीपलक्ष्मी भट,संपर्क मित्र