मुंबई,
Dilip Khedkar granted anticipatory bail नवी मुंबईत ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात फरार निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर अटकपूर्व जामीन मिळाला आहे. १२ सप्टेंबरला मुलुंड-आयरोली लिंक रोडवर २२ वर्षीय प्रल्हाद कुमारच्या ट्रकने खेडकरांच्या लँड क्रूझरला धक्का दिला. संतापून खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने प्रल्हाद कुमारवर मारहाण करून त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि पोलिस ठाण्यात नेतो असे सांगून अपहरण केले, असा गंभीर आरोप नोंदवण्यात आला.
पोलिसांनी १४ सप्टेंबरला प्रल्हाद कुमार सुरक्षित सोडवला. ६ ऑक्टोबरला खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला, परंतु १६ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने मंजूर केला. त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनाही चौकशीमध्ये अडथळा आणल्याचा आरोप होता; त्यांच्या अटकपूर्व जामीनाची माहिती पोलिसांकडे नव्हती. मनोरमा खेडकर यांचा पूर्व इतिहासही वादग्रस्त आहे; बनावट कागदपत्रांवर मालमत्तेवर कब्जा, शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन यासह अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यामुळे पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.