नागपूर,
Dr. A. P. J. Abdul Kalam गांधीनगर येथील श्री विवेकानंद वाचनालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यवाह मधुसूदन शेंबेकर यांनी प्रास्ताविक केले.
अध्यक्ष ॲड . विवेक पळशीकर यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याची माहिती देत त्यांचे परिश्रम, सातत्य आणि ज्ञानलालसा हे गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. Dr. A. P. J. Abdul Kalam कोषाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले, तर वैजयंती काणे आणि कर्मचारी हेमा जोशी, उर्वशी यादव, राखी नायडू यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सौजन्य:संदीप तिजारे,संपर्क मित्र