शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन; शासन आदेशाची होळी

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
farmers-protest अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३१६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, हे पॅकेज केवळ आकड्यांची हेराफेरी असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेने आज १६ रोजी धरणे आंदोलन करून शासन निर्णयाची होळी केली.
 
 
district-newspaper-sellers-association
 
शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन पिकाचा चारकोल रॉट व यलो मोझॅकने फडशा पाडला. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत आहे. शेतकर्‍यांचे कैवारी असे म्हणत राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी ३१६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. farmers-protest पण हे पॅकेज केवळ आकड्यांची हेराफेरी असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळणारेच आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेटरी ५० हजार रुपये मदत देण्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप, शेतकरी संघटनेच्या नेत्या माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडी प्रदेश प्रभारी शैला देशपांडे, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर, युवा आघाडी माजी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी केले. आंदोलनात नंदू काळे, विजय राठी, वसंत वर्‍हाडे, शांताराम भालेराव, नितीन भगत, राजू नगराळे, दामू वादाफळे, विजय धोटे, सुखदेव पाटील, सुनिल हिवसे, जिवन गुरनूले, बाबाराव दिवांजी, पुंडलीक हुडे, हेमराज ईखार, सचिन ठवरी, सारंग दरणे, डॉ. अनिल पोफळे, प्रभाकर झाडे, गोविंद पेटकर, खुशाल हिवरकर, बाबाराव पठाडे, प्रकाश ढोक, श्याम मारघोडे, मिलींद देशपांडे, पिंटू महाजन, मधुकर येनकर, पदमाकर राऊत, दत्ता राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.