जेष्ठ नागरिकांचे मोफत डोळ्याची तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
बुलढाणा, 
free-eye-check-up-and-medical-camp नेशनल असोसिएशन फॉर व ब्लाईड जिल्हा शाखा बुलडाणा व चैतन्य जेष्ठ नागरिक संघ बुलडाणा यांच्या वतीने जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांचे मोफत डोळ्याची तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन दि. १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
 
 
free-eye-check-up-and-medical-camp
 
कार्यक्रमाचे औचित्य साधून आपल्या दिव्यांगावर मात करून कठोर परिश्रमाने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उच्च पदावर शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत आहेत. अश्या मुकबधीर अस्थिव्यंग, अंध बांधवांचा या दिनाच्या निमित्याने संस्थेतर्फे प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अतिजेष्ठ नागरिकांचा सुद्धा याप्रसंगी आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेश्याम चांडक, शल्य चिकीत्सक डॉ दत्तात्रय बिराजदार, अति. शल्यचिकीत्सक डॉ. भागवत भुसारी, मनोज मेरत. सहा. संचालक समाज कल्याण बुलडाणा, प्रा. डी. एस. लहाने, मधुसूदन कुलकर्णी. तेजराव सावळे, पिंपरकर व शहरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. free-eye-check-up-and-medical-camp अंध बांधवांना पांढर्‍या काठीचे वाटप करण्यात आले. नेत्र तपासणी डॉ. शोन चिचोले डॉ. सुभाष जोशी, डॉ. रवी शिंदे, यांनी केले. चैतन्य जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष मधुसुदन कुलकर्णी, यांनी डॉ. वसंतराव चिंचोले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड चे उपाध्यक्ष रामकृष्ण म्हस्के, सचिव डॉ. वसंतराव चिचोले, दिलीप नागरिक, ह्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन रामकृष्ण म्हस्के यांनी केले.