नागपूर,
gold-rate-nagpur सोन्याचे दर झपाट्याने वाढत असून दिवाळीत सोन्याला आणखी झळाळी मिळणार आहे. धनत्रयोदशीपर्यंत सोने १.३० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता इतवारीतील सराफा व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख २७ हजार ७०० रुपये होते. तर चांदी १ लाख ७८ हजार ९०० रुपये दर होता.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्या दरावर होत आहे. gold-rate-nagpur त्यामुळे सोने व चांदीच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. वर्षभरात सोन्याचे दर आतापर्यंत जवळपास ५० टक्क्यांनी वाढले असून मागील तीन वर्षांत सोन्याच्या दरांमध्ये १४० टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीचा वापर सौर पॅनेलपासून ते विविध इलेक्ट्रॉनिक केला जात असल्याने उद्योगांकडून चांदीला मोठी मागणी होत आहे. सध्या, चांदीच्या एकूण मागणीपैकी ५९ टक्के मागणी औद्योगिक क्षेत्रातून होत आहे. चांदीने पर्यायी गुंतवणूक संधी शोधणार्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.