नागपूर,
prakash-parv : शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर येथे विद्यार्थ्यांनी कलेच्या रंगात आणि दिव्यांच्या प्रकाशात दिवाळी साजरी केली. कलावृंद व सांस्कृतिक समितीच्या सौजन्याने बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात “प्रकाश पर्व - २०२५” या दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळी, देखावे आणि नृत्यकलाकृतींचे प्रदर्शन अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले. कार्यक्रमातील दीपप्रज्वलनानंतर परिसरात निर्माण होणारे प्रकाशमय वातावरण अत्यंत आकर्षक होते. यावेळी कलावृंद समितीचे अध्यक्ष प्रा. विकास जोशी, सांस्कृतिक अध्यक्ष प्रा. पंकज इटकेलवार आणि अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांच्यासह मोठ्या संख्येत विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.