"माझ्यावर 'आतंकवादी' म्हणून आरोप, वडिलांनाही नाही सोडले !"

विरोधकांवर गंभीर आरोप

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
उत्तर प्रदेश
Ikra Hasan उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या इकरा हसन यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्या विरोधकांवरील आक्रमण करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जातीवाचक आणि अपमानास्पद शब्दांनी लक्ष्य करण्यात आले. “माझ्यावर ‘मुल्ली’, ‘आतंकवादी’ अशी टिप्पणी केली गेली. माझ्या वडिलांना अपशब्द वापरले गेले,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
 
 
Ikra Hasan
ही प्रतिक्रिया त्यांनी त्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर दिली ज्यामध्ये काही युवक दुचाकीवरून जाताना इकरा हसन आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अत्यंत हीन भाषा वापरत असल्याचे दिसून आले होते. या व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले आणि हसन यांनी संबंधित व्यक्तींविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली होती, मात्र काही काळाने त्यांची जामिनावर सुटका झाली.इकरा हसन यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट शब्दात सांगितले की हा प्रकार एकदाच झालेला नाही, तर हे प्रकार वारंवार घडत आले आहेत. “लोक म्हणतात, मेवातवाल्यांना माफ केलं, मग यांना का नाही? पण हे पहिल्यांदा झालेलं नाही. हे अनेक वेळा झालं आहे. त्यामुळे मी माफ करणार नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले.विशेष म्हणजे, ज्यांच्यावर अपशब्द वापरण्याचा आरोप आहे, त्यांचा संबंध भाजपच्या एका माजी खासदाराशी असल्याचा आरोपही इकरा हसन यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा सूचक आरोप करत, या सर्व प्रकारात भाजपशी संबंधित व्यक्तींचा हात असल्याचे स्पष्ट केले.
 
 
या प्रकारामुळे Ikra Hasan उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, समाजवादी पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे. विरोधी पक्षांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.राजकीय विरोधकांच्या आरोपांपासून स्वत:चा बचाव करताना इकरा हसन यांनी आपले मत मांडताना जेवढा आत्मविश्वास दाखवला, तेवढीच त्यांनी समाजातील द्वेषपूर्ण राजकारणावरही चिंता व्यक्त केली. “जर तुम्ही एखाद्या महिलेला केवळ तिच्या धर्मावरून लक्ष्य करत असाल, तर हा समाज म्हणून आपला पराभव आहे,” असे तीव्र शब्दात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.हे प्रकरण केवळ एक राजकीय वाद नसून, महिला आणि अल्पसंख्यांक नेत्यांवरील दबावाचा आणि सामाजिक विषमतेचा एक गंभीर मुद्दा बनला आहे. यावर कायद्यानं आणि समाजानं योग्य ती प्रतिक्रिया दिली, तरच अशा घटना रोखता येतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.