नवी दिल्ली
India Russia oil trade डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका वक्तव्यानं आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, "भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, याची मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक खात्री दिली आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली असून तेलाच्या किंमतींनी उसळी घेतली आहे.
या दाव्याच्या India Russia oil trade पार्श्वभूमीवर अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत हा रशियाकडून सर्वाधिक कच्चं तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक असून, या व्यापारातून दोन्ही देशांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे भारताने जर खरोखरच रशियाकडून तेल खरेदी थांबवली, तर त्याचा परिणाम केवळ भारतावर नव्हे, तर संपूर्ण जगभरातील तेल पुरवठा साखळीवर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
येत्या काही दिवसांत भारत यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती मिळत आहे. परंतु अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून ट्रम्प यांच्या दाव्यावर कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबत सध्या जगभरात तर्क-वितर्क सुरू आहेत.
दरम्यान, India Russia oil trade ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतरच ब्रिटनमधील काही तेल उत्पादक कंपन्यांनी चीनच्या दोन तेल कंपन्यांसह भारतातील नायरा एनर्जी या खासगी रिफायनरी कंपनीवर निर्बंध लादले आहेत. रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करत असल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या दबावामुळेच हे निर्बंध लादण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या महिन्यात भारताने रशियाकडून तेल आयात कमी केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. यामागे अमेरिकेचा वाढता दबाव हेच मुख्य कारण असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची चीनमध्ये बैठक झाल्याचंही लक्षात घेण्याजोगं आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरही कठोर टॅरिफ लादल्याचा उल्लेख करत अमेरिकेने व्यापार युद्धात चुकीची भूमिका घेतल्याचंही मान्य केलं. याच संदर्भात भारतावर लादलेले टॅरिफ आणि रशियासोबतचा तेल व्यवहार यावरून अमेरिका भारतावर नाराजी व्यक्त करत असल्याचेही संकेत आहेत.
सध्या तेलाच्या जागतिक किमतींमध्ये वाढ सुरू झाली असून, बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर त्या निर्णयाचे परिणाम केवळ आर्थिकच नव्हे, तर भूराजकीय पातळीवरही भासतिल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.पुढील काही दिवसांत भारताची अधिकृत भूमिका काय असते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य निर्णयाकडे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय लक्ष ठेवून आहे.