अमरावती,
mla-ravi-rana महाराष्ट्र विधानभवन येथे आज शालेय शिक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित ३७ आश्वासनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या आश्वासन समितीच्या अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस समितीचे सदस्य आमदार अमित झनक, विक्रम पाचपुते, राजेश पवार, समीर मेघे, अनुप अग्रवाल, विनोद अग्रवाल, सचिन कल्याण शेट्टी, पराग शहा, रमेश कराड, किशोर पाटील, अमोल पाटील, प्रदीप जयस्वाल, किरण सामंत, हिरामण खोसकर, संजय बनसोडे, दौलत दरोडा, वरुण सरदेसाई व राजू खरे आदी सदस्य उपस्थित होते.
बैठकीत शालेय पोषण आहार वितरणामध्ये झालेल्या अनियमितता व आहाराच्या दर्जा यावर चर्चा झाली. mla-ravi-rana यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व कन्झ्युमर फेडरेशन यांच्याकडून किती वर्षांपासून आहार पुरवठा केला जात आहे, याची माहिती मागवण्यात आली. सदर फेडरेशन स्वतःकडून पुरवठा करतात की, त्यांनी खासगी कंत्राटदारामार्फत काम करून घेतले आहे, याची माहितीही मागविण्यात आली आहे. ज्याठिकाणी पोषण आहार वितरणात अनियमितता आढळली आहे, त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश समितीच्या माध्यमातून संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक सुखदेव देरे यांनी त्याच्या कार्यकाळत आरक्षण डावलून नियुक्त्या करून कोट्यावधीचा गैरव्यावहार केल्याबद्दल समिती मार्फत त्यांच्या सेवानिवृत्त वेतनातून दरमहा १० टक्के इतकी रकम ४ वर्षा करीता कपात करण्यात, यावी असे आदेश देऊन त्यांचा अहवाल समितीला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा देण्यात यावे. जिल्ह्याचे ठिकाणी असलेले स्टेडियम दर्जेदार करण्याचे समितीने सूचित केले.