नागपूर,
Karmannai School of Excellence कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्स तर्फे विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षितता आणि जागरूकता वाढवण्यासाठी “गुड टच आणि बॅड टच” या विषयावर एक प्रभावी कार्यशाळा घेण्यात आली.अध्यक्ष प्रतिभा घाटे आणि संचालिका प्रीती कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, हा उपक्रम कोशिश फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
फाउंडेशनच्या तज्ज्ञ टीममधील डॉ. सोनिका कोच्छर, प्रा. भाग्यश्री वानखेडे, प्रा. अयमान खान आणि प्रा. साहिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षितता, वैयक्तिक मर्यादा आणि विश्वासू वयस्कांशी संवादाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. Karmannai School of Excellenceमुख्याध्यापिका डॉ. उन्नती दातार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळांमध्ये अशा जागरूकता सत्रांची गरज अधोरेखित केली.
सौजन्य:डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र