नागपूर ,
Lions Club of Nagpur मा. इरा हीलिंग्स आणि लायन्स क्लब ऑफ नागपूर मेट्रोपॉलिटन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहांगण दिव्यांग मुलांची शाळा, मातृसेवा संघ, नागपूर येथे मानसिक आरोग्य जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले.याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच तणावमुक्त, आनंदी आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता.
सत्राचे मार्गदर्शन मा. इरा हीलिंग्सच्या संस्थापक आणि हीलर पियू लाहोरी यांनी केले. त्यांनी ध्यान, श्वसनक्रिया आणि सकारात्मक विचारसरणीच्या माध्यमातून तणाव, चिंता आणि आत्मविश्वासाची कमतरता यावर नियंत्रण मिळविण्याचे तंत्र स्पष्ट केले.कार्यक्रमात Helping Hands उपक्रमाचे अपूर्वा खोड़े आणि सरंग खोड़े यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी आणि यशस्वी झाला.Lions Club of Nagpur या प्रसंगी इंडियन ऑईलचे प्रतिनिधी रोहित यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छता किट्सचे वितरण केले तसेच सर्व मुलांना चॉकलेट देऊन आनंदाचे क्षण दिले.शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालिनी देशमुख यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, भावनिक स्थैर्य निर्माण होते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.”कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्प ध्यान आणि शांती सत्र घेण्यात आले.
सौजन्य :पियु लाहोरी ,संपर्क मित्र