कॅन्सर जिंकला मित्रांनो, ही माझी शेवटची दिवाळी,' 21 वर्षीय तरुणाची पोस्ट व्हायरल
दिनांक :16-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
21-year-old-boy-viral-post दिवाळीचा सण जवळ आला आहे. सर्वजण उत्साहात तयारीत गुंतलेले आहेत. पण या सणाच्या पार्श्वभूमीवर २१ वर्षांच्या एका तरुणाने रेडिटवर अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे की, ती वाचून लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे – “मित्रांनो, कॅन्सर जिंकला आणि मी हरलो.” त्याने दिवाळीपूर्वी आपल्या वेदना व्यक्त करत सांगितले की, “कदाचित मी या वर्षी जिवंत राहणार नाही.”
रेडिटवर लिहिलेल्या या पोस्टमध्ये तरुणाने सांगितले की, अनेक महिन्यांच्या केमोथेरपी आणि रुग्णालयातील वास्तवानंतर डॉक्टरांनी आता सर्व उपचारांच्या शक्यता संपल्याचे सांगितले आहे. 21-year-old-boy-viral-post त्यामुळे तो या वर्षाअखेरीस जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी आहे. या पोस्टने सोशल मीडियावर भावनांचा पूर आला असून, हजारो लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.