दुर्गा मंदिरात वसुबारस निमित्त गोमाता पूजन

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Festival Vasubaras भारतीय कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गोमातेच्या पूजनाचा उत्सव वसुबारस निमित्त प्रताप नगरातील श्री दुर्गा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम उद्या,  दिनांक शुक्रवार, १७ ऑक्टोबर,आश्विन वद्य द्वादशीला सकाळी ८.३० वाजता श्री दुर्गा मंदिर, प्रताप नगर येथे होणार आहे.
 
baras
 
 दीपावली उत्सवाची सुरुवात गोवत्स पूजनाने होते. याच परंपरेचा मान राखत मंदिरात मागील वर्षाप्रमाणे यंदाही मंत्रोच्चारात गोमाता पूजन होणार आहे. Festival Vasubaras परिसरातील सर्व नागरिकांसाठी पूजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.नागरिकांनी या पूजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
सौजन्य:श्याम काळे,संपर्क मित्र