धारणी,
arogya-bhushan-award पद्मश्रीचा बहुमान आणि अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मेळघाटचे डॉ. रवि व स्मिता कोल्हे यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार - २०२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुणे येथे प्रदान केला जाणार असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
२०२५ चा महाराष्ट्र आरोग्य पुरस्कार डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्याची माहिती संयोजक उमेश चव्हाण (प्रथम आरोग्य साहित्य संमेलन), अध्यक्ष अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ पुणे तथा आयएमए महाराष्ट्र सहसंयोजक अविनाश भोंडवे यांनी एका पत्राद्वारे दिलेली आहे. arogya-bhushan-award पुणे येथील प्रथम आरोग्य साहित्य संमेलन २०२५ स्थान बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. १९ ऑक्टोबरला सकाळी पुरस्कार सोहळा असून याप्रसंगी आरोग्य महोत्सवानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे ऐतिहासिक आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे. या आरोग्य महोत्सवात दिव्यांगांना कृत्रिम हात व पायाचे वाटप पण मान्यवरांच्या हस्ते होईल. कॅन्सर, घुडगा तपासणी, मेंदु रोगावर उपचार, हृदयरोग तपासणीसह सर्वच रोगांची तपासणी व उपचार केले जातील.
मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात आदिवासींचे जीवन अत्यंत खडतड असल्याने आरोग्य, शेती व वाहतूक, वीज, रस्ते या विषयांवर शासनाने भरपूर काम केले असले तरी खूप काम व्हायचे आहे, असे डॉ. रवि कोल्हे म्हणाले. arogya-bhushan-award पुरस्काराबाबतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानताना डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील अतिवृष्टीसह इतर समस्या त्यांना सांगणार असे प्रतिपादन केले. अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी कोल्हे दाम्पत्यांना पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.