मुंबई,
Raj Thackeray's meeting before Diwali महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत मागील दोन दिवस निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत तातडीचा पक्ष मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात राज ठाकरें काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मतदारयादीवर उठलेल्या शंका लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

या बैठकीत त्यांनी बुथनिहाय मतदारयादीची पडताळणी करण्याचे आदेश दिले आणि संघटनात्मक बांधणीसंबंधी मार्गदर्शन केले. मागील दोन दिवस त्यांनी महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेत उभ्या राहिलेल्या अडचणींबाबत चर्चा केली होती. राज ठाकरे यांनी मतदारयादीतील त्रुटी दूर न झाल्यास सहा महिने निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचेही अधोरेखित केले. याच पार्श्वभूमीवर रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हा तातडीचा मेळावा आयोजित केला असून, बीएला, गटाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, बूथ लेव्हल एजंट्सची भूमिका, मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रचाराचे दिशानिर्देश यावर राज ठाकरें मार्गदर्शन करतील, असे अपेक्षित आहे. या तातडीच्या मेळाव्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे कोणत्या नवीन सूचना देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.