दृष्टिक्षेप
प्रफुल्ल केतकर
ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर Rashtriya Swayamsevak Sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करीत असताना, त्याबद्दल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे, त्याबरोबरच टीकाकारही आपापले हल्ले करण्यासाठी तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० रुपयांचे स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केल्याने कम्युनिस्ट आणि त्यांच्या काही काँग्रेसी समर्थकांसह इस्लामवादी लोकांमध्येही खळबळ उडाली आहे. मनुवादी, महिला-विरोधी, संविधान विरोधी आणि अल्पसंख्यक विरोधी या संघाविषयीच्या आपल्या जुन्या वक्तृत्वात पडण्याऐवजी, सर्व भारतीयांनी एक विचार, प्रक्रिया, चळवळ आणि मिशन म्हणून शतकाच्या या शानदार अभियानाच्या यशाचे रहस्य समजून घेतले पाहिजे.
Rashtriya Swayamsevak Sangh विचारांच्या पातळीवर, संघ हा त्या अन्य संघटनांपेक्षा वेगळा आहे, ज्या ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान स्थापन झाल्या होत्या. उद्दिष्टे आणि संरचनांच्या औपचारिक मांडणीऐवजी, संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सामूहिक निर्णय प्रक्रियेवर आधारित प्रक्रिया विकसित करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये विविध दृष्टिकोन लोकशाही पद्धतीने ऐकणे आणि एकमतावर पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले गेले, जे मोठे लक्ष्य किंवा उद्दिष्ट साध्य करण्यास सक्षम राहील. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या अनेक चळवळींमधील त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून, मूळ समस्येचे त्यांचे निदान अचूक आणि स्पष्ट होते. त्यांनी ओळखले की, वसाहतवादामुळे आत्मबोधाची, ची भावना नसणे आणि सामाजिक संरचनांचा र्हास ही आमच्या राजकीय आणि मानसिक अध:पतनाची मूळ कारणे आहेत. वैयक्तिक चारित्र्य राष्ट्रीय चारित्र्यापासून पूर्णपणे वेगळे झाले होते. जोपर्यंत या मुद्यांकडे लक्ष दिले जात नाही तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळवता किंवा टिकवता येत नाही. रा. स्व. संघाच्या स्थापनेमागील ही त्यांची मूलभूत धारणा होती. संघ लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करणे होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन करताना म्हटले, ‘संघ म्हणजे एका प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन होय, जिथे राष्ट्राची चेतना वेळोवेळी प्रत्येक युगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन स्वरूपात प्रकट होते. संघ हा या युगातील त्या शाश्वत चेतनेचा एक पवित्र अवतार आहे’. पूर्वीच्या ऋषीमुनींप्रमाणे संघाचे संस्थापक आणि त्यांच्या उत्साही अनुयायांनी कधीही नवीन काही केल्याचा दावा केला नाही; त्याऐवजी, त्यांनी समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी प्राचीन स्वदेशी मूल्यांचा जागर केला. म्हणूनच, इतर उपक्रम, संस्था आणि रा. स्व. संघ यांच्यातील महत्त्वाचा फरक असा आहे की प्रत्येकाने व्यक्तिमत्त्व किंवा विचारसरणीच्या समाजात स्वतःचे संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु संघाने राष्ट्रीय चेतनेच्या पायावर संपूर्ण समाजाला संघटित करण्याचे कार्य सुरू केले.
या समस्या सोडवण्याची प्रक्रिया देखील अद्वितीय आणि नावीन्यपूर्ण होती - जी देशाच्या प्राचीन तत्त्वज्ञानात रुजलेली होती परंतु, आधुनिक वैशिष्ट्यांसह. दैनंदिन प्रार्थना, खेळ याशिवाय स्वयंसेवकांनी सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यासाठी विशिष्ट वेळ अपेक्षित आहे. एक तासाची शाखा, ज्यात भारतमातेचे एकमेव देवी म्हणून पूजन केले जायचे, स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण केंद्र बनली. हे स्वयंसेवक त्यांचे उर्वरित तेवीस तास राष्ट्रीय चेतना, राष्ट्रभावनेसह जगायचे. हे प्रशिक्षण, बारकाईने नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सांघिक खेळ, देशभक्तीपर गीते आणि सामूहिक संकल्पाच्या माध्यमातून ते अशा विशिष्ट मूल्यांचे पोषण करण्यास सक्षम व्हायचे, राष्ट्रीय पुनर्बांधणीत सार्थक योगदान देतात. हे स्वयंसेवक, श्रम, शिक्षण, कला आणि आरोग्यसेवा यासारख्या राष्ट्रीय जीवनाच्या विविध क्षेत्रात काम करताना, भारतीय मूल्यांवर आधारित संघटना बांधणी आणि संरचनात्मक सुधारणांच्या माध्यमातून शाखेत रुजलेल्या मूल्यांना अधिक आत्मसात करतात.
एक चळवळ म्हणून, Rashtriya Swayamsevak Sangh संघ हा एक बहुआयामी प्रयत्न आहे, जो राजकीय दृष्टिकोनातून त्याचे मूल्यांकन करू लोकांना समजणे कठीण होईल. रा. स्व. संघ मूलत: वसाहतवाद विरोध आणि पुनर्राष्ट्रीयीकरणाची चळवळ आहे. सर्व गोष्टी काळानुरूप राष्ट्रीय आणि सर्व विदेशी गोष्टी राष्ट्रीय मूल्यांना अनुसरून करणे हे या चळवळीचे सार आहे. स्वदेशी चळवळीचा अर्थ केवळ स्वदेशी वस्तूंची खरेदी आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणे असा नाही, तर राष्ट्रीय मूल्ये आणि आधारित संपूर्ण व्यवस्थेची पुनर्रचना करणे होय. ऐतिहासिक संकल्पनांपासून ते राजकीय संरचनांपर्यंत, भारतीय विचारांचे सुधारात्मक पद्धतीने पुनर्लेखन केले पाहिजे. म्हणून जातिवादाचे उच्चाटन केले पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की हिंदू धर्माची निंदा केली पाहिजे. बाबर आणि औरंगजेब यांना आक्रमक मानून त्यांना स्पष्टपणे नाकारले पाहिजे; म्हणून, मुसलमानांना त्यांचे वारस मानण्यात नये. सर्व भारतीय भाषांचा आदर आणि स्वीकार केला पाहिजे; याचा अर्थ असा नव्हे की विदेशी भाषांची निंदा केली पाहिजे. संघाचे विचार आणि कृती सर्वसमावेशक आणि सहभागी चळवळ बनल्याशिवाय ही प्रक्रिया शक्य नाही. स्वयंसेवकांच्या माध्यमातून रा. स्व. संघाने अद्वितीय जनसंपर्क कार्यक्रम तयार केले आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी निधी संकलन हे या संदर्भात एक उत्कृष्ट उदाहरण आहे, जिथे जात, समुदाय आणि प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन भारताच्या कानाकोपर्यातून लक्षावधी लोकांनी संस्कृती स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघाचे उद्दिष्ट समाजापासून वेगळे राहण्याऐवजी सामूहिक राष्ट्रीय चेतनेच्या माध्यमातून स्वतःला समाजाशी जोडणे हे आहे.
लक्षावधी Rashtriya Swayamsevak Sangh स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची तपश्चर्या आणि बलिदानाने केलेल्या संपूर्ण प्रयत्नाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह व तत्कालीन मद्रास प्रांतात संघाच्या कार्याचा अफाट विस्तार करणारे दादाराव परमार्थ यांनी याचे समर्पक उत्तर दिले आहे. दादाराव परमार्थ यांनी स्पष्ट केले की संघ हा हिंदू राष्ट्राच्या जीवन ध्येयाचा एक विकास आहे. ते जीवन ध्येय काय आहे? सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आपल्या विजयादशमीच्या भाषणात स्पष्ट केल्याप्रमाणे, ‘जागतिक इतिहासात वेळोवेळी, भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे - त्याने जगाचा हरवलेला समतोल पुनर्संचयित केला आहे, जागतिक जीवनात संयम आणि शिस्तीची भावना निर्माण करणारा धर्म प्रदान केला आहे.’ सरसंघचालकांचे हे प्रतिपादन म्हणजे हिंदू राष्ट्राच्या जीवन ध्येयाचे अचूक स्पष्टीकरण होय. संघ एक प्रक्रिया आणि चळवळ आहे ज्याचा उद्देश हे राष्ट्रीय मिशन अर्थात ध्येय साध्य करण्यासाठी समाजाला तयार करणे हे होय.
गेल्या शतकात, हजारो कार्यकर्त्यांनी प्रचारक म्हणून आपले वैयक्तिक जीवन राष्ट्राला अर्पण केले आहे; त्यापैकी लाखोंनी त्यांचे कौटुंबिक जीवन संघाच्या कार्याशी संतुलित केले आहे आणि लक्षावधी कुटुंबांनी संघाच्या कार्यात मोठे योगदान दिले ज्यामुळे राष्ट्रीय ध्येय साध्य करणे शक्य झाले आहे. वसाहतवादी मानसिकतेच्या लोकांकडून सतत राक्षसीकरण आणि द्वेष असूनही संघाने समाजाचा विश्वास जिंकला आहे. सामाजिक अपेक्षा जास्त आहेत, परंतु संघाचा उद्देश एकमेव तारणहार अथवा रक्षक बनण्याचा नाही. त्याऐवजी, डॉ. हेडगेवार यांनी कल्पना केल्याप्रमाणे, समाजाने बाह्य आव्हानांना तोंड देताना स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राहण्यासाठी, आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी स्वतंत्रपणे अंतर्गत व्यवस्था निर्माण करावी. भारत ज्या आदर्शांचा प्रतीक आहे ते आमच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात प्रतिबिंबित झाले पाहिजेत, जेणेकरून संपूर्ण विश्व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकेल. त्यानंतरच जग भारताला विश्व-गुरू मानेल, जसे तो कधीकाळी होता. आपण विचार समजून घेऊया, प्रक्रिया रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि भाग घेऊया जेणेकरून ‘हिंदू राष्ट्राचे जीवन ध्येय’ पूर्ण होईल. तोपर्यंत, संघाची वाटचाल अखंड सुरूच राहील... भारत माता की जय!
(ऑर्गनायझरवरून साभार)