आजनसरा येथे रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
आजनसरा,
rashtriya-swayamsevak-sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजनसरा शाखेचा विजयादशमी उत्सव स्थानिक भोजाजी महाराज देवस्थान येथे साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आजनसरा येथील प्रसिद्ध उद्योजक रामाजी आष्टनकर यांची उपस्थिती होती.
 
 
rashtriya-swayamsevak-sangh
 
यावेळी दंड, नियुद्ध, सांघिक गीत व रोमहर्षक प्रात्यक्षिक सादर केली. rashtriya-swayamsevak-sangh कार्यक्रमापुर्वी शहरातून निघालेल्या पथसंचलनाचे भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, माजी सरपंच श्रावण काचोळे, विहिंप वडनेर प्रखंड अध्यक्ष डॉ. संदीप लोंढे, निलेश कोसूरकर, संदीप तिजारे, मोहन चौधरी, जयश कुंभलकर, अविनाश जौजाळ आदींनी गुलाब पुष्प उधळून स्वागत केले. कार्यक्रमाला येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर चांभारे, रामाजी कोपरकर, रामकृष्णा कोपरकर, राजेश्वर कोपरकर, निलेश कोसूरकर, जयश कुंभलकर, संदीप तिजारे, मोहन चौधरी, युवकांसह महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.