नोकरीचे आमिष देऊन १२ लाखांचा गंडा

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट, 
12-lakhs-duped-by-promising-job रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून येथील दोघांची १२ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना महात्मा फुले वार्डात उघडकीस आली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
12-lakhs-duped-by-promising-job
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक ब्राह्मणे (२३) रा. महात्मा फुले वार्ड याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. प्रियंका (४०) आणि रामचंद्र पाटील (४२) रा. छिंदवाडा मध्यप्रदेश यांनी अभिषेकला आमची मंत्रालयात ओळख असून तुला रेल्वेत नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगितले. त्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. 12-lakhs-duped-by-promising-job तर अभिषेकने त्याचा मित्र मयूर कापटे (३१) रा. दत्त मंदिर वार्ड याच्या नोकरीसंदर्भात सुद्धा चर्चा केली. त्यावर प्रियंका पाटील यांनी होकार दिला. यानंतर या दोघांनी टप्प्याटप्प्यांनी १२ लाख रुपये दिले. परंतु, वर्ष लोटूनही त्यांना नोकरीचे पत्र दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.