वर्धा,
pandit-shankar-prasad-agnihotri जीवनातील आनंद, वेदना आणि भावना यांचे सूक्ष्म स्पंदन व्यत करण्यासाठी गीत-संगीत हे प्रभावी माध्यम आहे. संगीत केवळ मनोरंजन नसून ते मनःशांती आणि आत्मानंदाचा अमृतझरा आहे. संगीत हे आत्म्याशी संवाद साधण्याचे साधन आहे. एखाद्या रागात, भजनात किंवा भक्तिगीतात तन्मयतेने सहभागी झाल्यावर आत्मानुभूतीची प्रक्रिया सुरू होते, प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.

ते सुजन म्युझिकल व जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने शिवशंकर सभागृह आयोजित स्व. किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विदर्भ स्तरीय खुली कराओके फिल्मी गीत गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. pandit-shankar-prasad-agnihotri ही स्पर्धा तीन गटात विभागल्या गेली होती. बाल गटात प्रथम पुरस्कार मनीष वरघट, द्वितीय पुरस्कार विदिशा वाटकर तर तृतीय पुरस्कार अन्विषा बेलखोडे यांनी पटकावला. ज्येष्ठ गटात पहिला पुरस्कार प्रशांत गुजर, द्वितीय सुरेश तायवाडे यांना तर तृतीय पुरस्कार अशोक तुर्कीयाल तसेच युवा गटात पहिला पुरस्कार १५ हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र नागपूरच्या लाजरी बुरे, द्वितीय पुरस्कार ८ हजार रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र जयश्री सुभेदार यांनी पटकावला. पहिल्या फेरीत परीक्षक म्हणून मनीषा देशकर कुलकर्णी आणि सुनील रहाटे यांनी तर अंतिम फेरीत परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे यांनी परीक्षण केले.
पुरस्कार वितरण पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, गायिका अनुपमा देशपांडे, दीपा देशपांडे, डॉ. अजय वाणे, संतोष जोशी, सुरेश गणराज, शशिकांत बागडदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यशस्वीतेसाठी अक्षय काटपाताळ, शाम तुपकर, नीलकांत देशमुख, अविनाश रिंगणे, शीतल काकडे, शेखर अग्रवाल, चारू साळवे, अजय देशमुख, प्रतीक सूर्यवंशी, सुविधा झोटिंग, प्रफुल्ल शिंगोटे, गणेश तोडे, अभिजित मिसाळ, दीपक विध्वंसकर, अनुराग मिसाळ, सुरेश चावरे यांनी परिश्रम घेतले. pandit-shankar-prasad-agnihotri कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे, डॉ. गजानन जंगमवार, डॉ. निरजसिंग यादव, डॉ. दीपक पुनसे, डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. दिनेश वंजारी, डॉ. रितेश सुळे, प्रा. अभिषेक सिंह, प्रा. निळकंठ ढोबाळे, अभिजित रघुवंशी, गणेश काळे आदी उपस्थित होते.