नागपूर,
State-level basketball tournament- डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय अंडर-१९ मुली बास्केटबॉल स्पर्धा आज दि. १६ ऑक्टोबरला रोजी एन.बी.वाय.एस. मैदानावर पार पडली.
या स्पर्धेत अंडर-१९ मुलींच्या चमूने चंद्रपूरवर २५-२ ने विजय मिळवला, तर अंतिम सामन्यात स्कूल ऑफ स्कॉलर्स संघावर २०-२ ने मात करून विजेतेपद पटकावले आणि राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरल्या. State-level basketball tournament चमूत आनंदी सोनवणे, निशिता बाकरे, अनन्या प्रभुणे, विधी गटलेवार, अक्षदा इंगळेकर, अदिती दमके, साही खोपडे, नमस्वी तावडे, रेणुका अतकरे, स्पर्शिका गाट, अश्लेषा दाभाडकर आणि खुशी गिरहे या विद्यार्थिनींचा समावेश होता.या विजयानंतर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, उपप्राचार्या हर्षा बोरकर, पर्यवेक्षक प्रा. कुणाल पाटील तसेच सर्व शिक्षकवृंदांनी चमूचे अभिनंदन केले.विजेत्या विद्यार्थिनींनी त्यांच्या यशाचे श्रेय प्रा. कुणाल पाटील यांना दिले.
सौजन्य:प्रफुल ब्राम्हणे,संपर्क मित्र