गुन्हेगारी जगतातील वर्चस्व उठले जीवावर

- शहरात चाेवीस तासांत दाेन खून

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
murder-in-nagpur शहरात दिवाळी सणानिमित्त खरेदी-विक्रीसाठी वर्दळ सुरु असतानाच गुन्हेगारी जगतात अनेक टाेळ्या एकमेकांच्या माग घेत आहेत. काही नवीन टाेळ्यांचे वर्चस्व वाढत आहेत तर जुन्या टाेळ्यांच वर्चस्व कमी हाेत आहे. याच संघर्षातून गुन्हेगारी जगतातील वर्चस्व जीवावर उठले आहेत. गुन्हेगारांच्या दाेन टाेळ्यांतील वर्चस्वाच्या वादातून चाेवीस तासांत दाेन खुनाच्या घडल्या आहेत. इमामवाड्यातील जाततराेडी आणि कामठी परिसरातील नेरी भागात या दाेन्ही घटना घडल्या.
 
 
murder-in-nagpur
 
पहिल्या घटनेत, इमामवाड्यातील कुख्यात गुंड निलेश ऊफर् बाळा अंबादरे (35, जाततराेडी) हा वस्तीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत हाेता. बाळावर अजनी, अंबाझरी,गणेशपेठ, वस्तीतील लहान मुलांवर वचक ठेवण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण करीत हाेता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने दाेन 17 वर्षांच्या एका मुलाला काही पैसे दिले हाेते. ते पैसे परत मागताना बाळा शिवीगाळ करुन मारहाण करीत हाेता. त्यामुळे दाेन्ही मुले चिडून हाेते. त्यांनी बाळाचा खून करण्याचा कट रचला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाटतराेडी परिसराच्या बारा सिग्नलमधील बाेरकरनगर नाल्याजवळ बाळा उभा असल्याचे त्यांना कळले. ते दाेघेही तेथे पाेहचले. त्यांनी बाळाच्या डाेळ्यात मिरचीपूड फेकली आणि चाकूने सपासप वार केले. बाळा जमिनीवर पडताच दाेघांनीही दगडाने ठेचून त्याचा खून केला. माहिती मिळताच ईमामवाड्याचे ठाणेदार जसवंत पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी पाेहाेचले. जखमी निलेश याला मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. murder-in-nagpur या प्रकरणी निलेशची बहिण मीनाक्षी राजू काेहळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपी विधीसंघर्षग्रस्त बालकाविरूद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.
निलेशवर 12 गंभीर गुन्हे
निलेश अंबादरे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर शहरातील इमामवाडा, अजनी, गणेशपेठ, सीताबर्डी पाेलिस ठाण्यात 12 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात दाेन हत्याकांडासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गणेशपेठेतील अलिकडेच घडलेल्या एका गुन्ह्यात ताे पाेलिसांना हवा हाेता. मात्र, ताे वारंवार पाेलिसांना गुंगारा देत हाेता. अन्यथा निलेशचा जीव वाचला असता.
टाेळीयुद्धातून खून
नवीन कामठी पाेलिस ठाणे हद्दीतील नेरी गावालगतच्या वीट भट्टीजवळ टाेळीयुद्धातून आणि जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादाचे भांडणात रुपांतर हाेऊन विवेक रमेश तांडेकर(वय 28 वर्षे, रा. नेरी, ता. कामठी) याचा आराेपी देवा वंजारी याने दाेन साथिदाराच्या मदतीने पाना आणि टाॅमीने वार करत खून केला. रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. murder-in-nagpur रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या विवेकला पाहून काेणीतरी नवीन कामठी पाेलिसांना माहिती दिली. रात्री दीडच्या सुमारास घटनास्थळी पाेचलेल्या पाेलिसांनी विवेकला रुग्णालयात नेले. मात्र, ताेवर त्याचा मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी या प्रकरणात देविदास उफर् देवा बारसुजी वंजारी( वय 42 वर्षे), केशव सुखलाल गिरी( वय 33 वर्षे) आणि साहील प्रमाेद घाटाेळे( वय 19 वर्षे, तिनही रा. नेरी) यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. विवेक आणि देवा या दाेघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गावातल्या वर्चस्वावरून वाद विकाेपाला गेला हाेता. दाेघेही वाळू माीया असल्याची माहिती आहे. याच वैमनस्यातून देवाने विवेकला संपवल्याची माहिती मिळत आहे.
एक ऑपरेशन टाेळ्यांसाठी हवे
पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी अनेक सकारात्मक अभियान राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ऑपरेशन व्हाईट वाॅश, मिशन नाईट वाॅच याचा समावेश आहे. शहरात जुन्या टाेळ्यांची दहशत कमी हाेत असताना नव्या टाेळ्या जन्मास येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी एक ऑपरेशन टाेळ्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी करावे, अशी मागणी हाेत आहे.