नागपूर,
Toxic cough syrup in Nagpur भेसळयुक्त कफ सिरपमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांच्या प्रकरणांमध्ये नवीन बळी समोर आला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील चार वर्षीय एका बालिकेचा नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या विषारी औषधामुळे मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीची तब्येत खालावल्यामुळे १४ सप्टेंबर रोजी तिला नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले होते.
तब्बल महिनाभर उपचाराखाली राहिल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि १५ ऑक्टोबरला तिने अखेरचा श्वास घेतला. सर्व मृत बालकांची नोंद मध्य प्रदेशातून असून, नागपूरमध्ये या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनाने भारतात तयार होणाऱ्या तीन कफ सिरपच्या वापरावर आणि वितरणावर तात्पुरता बंदीचा सल्ला दिला आहे. या औषधांचा समावेश कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रीलाइफ यामध्ये आहे. हे अनुक्रमे स्रिसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मा आणि शेप फार्मा यांनी तयार केलेले आहेत. या घटनेमुळे पालक आणि समाजात मोठा गोंधळ आणि चिंता निर्माण झाली असून, या विषारी औषधांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.