बुलडाणा,
union-minister-prataprao-jadhav नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी मेहकर शहरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आयुष, आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते एन सी डी आरोग्य तपासणी सुरक्षा रथ अंबुलेन्सचे लोकार्पण दि. १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत मागील चार महिन्यांत १० हजार नागरिकांची नेत्र व गैर-संसर्गजन्य आजारांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून ३ हजार २०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. union-minister-prataprao-jadhav आता पुढील १५ हजार नागरिकांपर्यंत तपासणीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा आरोग्यरथ तालुयात फिरणार आहे. या कार्यक्रमाला सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाढीया, दिलीपबापू देशमुख, योगेश जाधव, निरज रायमुलकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, शिवसेना-युवासेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.