संयुक्त राष्ट्र,
United Nations warning to the world संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने इशारा दिला आहे की जगभरातील सुमारे १.४ कोटी लोकांना तीव्र उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे. प्रमुख देणगीदारांकडून निधीमध्ये झालेल्या मोठ्या कपातीमुळे WFP च्या अनेक देशांतील मदतकार्यावर गंभीर परिणाम झाला आहे. WFP ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा संस्थेला इतिहासातील सर्वात मोठ्या निधी संकटाचा सामना करावा लागत आहे. पारंपारिकरित्या ब्लूएफटीला सर्वाधिक निधी देणाऱ्या अमेरिकेने (डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या काळात) आणि काही पाश्चात्य देशांनी आपले योगदान मोठ्या प्रमाणात घटवले आहे. परिणामी, अन्नसहाय्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या आयुष्यावर धोका निर्माण झाला आहे.
एजन्सीच्या अहवालानुसार, अफगाणिस्तान, काँगो, हैती, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सुदान या देशांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. लाखो लोकांची जीवनरेषा आपल्या डोळ्यांसमोर कोसळताना दिसत आहे, असे डब्लूएफटीच्या कार्यकारी संचालक सिंडी मॅककेन यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, यंदा संस्थेला गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे १० अब्ज डॉलर्सच्या बजेटवरून ते फक्त ६.४ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले आहे.
अमेरिकेकडून यंदा केवळ १.५ अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा असून, हे गेल्या वर्षीच्या ४.५ अब्ज डॉलर्सपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. इतर देशांनीही आर्थिक सहाय्य घटवले आहे. मॅककेन म्हणाल्या, हे फक्त निधीअभावाचं संकट नाही, तर आपण काय करायला हवं आणि प्रत्यक्षात काय करता येतं यातली मोठी तफावत आहे. या संकटामुळे उपासमारीविरुद्धच्या लढाईतील दशकांची प्रगती धोक्यात आली आहे. United Nations warning to the world सध्या जगभरातील सुमारे ३१९ दशलक्ष लोकांना गंभीर अन्नअभावाचा सामना करावा लागत आहे. गाझा आणि सुदानमध्ये दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानातील केवळ १० टक्के लोकांपर्यंतच अन्नसहाय्य पोहोचत आहे. अनेकांना पुढील जेवण कुठून मिळेल हेही माहीत नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.