अनिल कांबळे
नागपूर,
burglary-case-nagpur : शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चाेरांच्या टाेळ्या परराज्यातील असल्याचा पाेलिसांना संशय हाेता. या टाेळ्यांनी नागपूर पाेलिसांच्या नाकी नऊ आणले हाेते. त्यामुळे पाेलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवून उत्तरप्रदेशातील चाेरांच्या टाेळीला अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीतील 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहनवाज उर्फ शानू अहमद अली (35), दिलशाद अहमद अन्सारी (50), राजू उफर् झेंडू हिटलर वर्मा (42, तिघेही रा.बिजनाैर, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत.

उत्तरप्रदेशातील या टाेळीने गत 25 ऑगस्ट राेजी शहरातील एमआयडीसी पाेलिस ठाणे हद्दीतील यू-रीच अपार्टमेंट, टाकळीसीम येथे राहणारे प्रवीण यशवंतराव शेंदरे (47) यांच्या घरी चाेरी केली हाेती. चाेरट्यानी शेंदरे यांच्या घराच्या दाराचा कडीकाेंडा आणि कुलूप ताेडून आत प्रवेश केला. घरातून 25 हजार रुपयांची राेख तसेच साेन्या-चांदीचे दागिने असा मिळून 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरला आणि पळ काढला. या प्रकरणी शेंदरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपींविरूद्ध गुन्हा दाखल केला हाेता. घटनेच्या तपासात पाेलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही
फुटेज तपासले. यानंतर उत्तरप्रदेशातून तिघांनाही अटक केली.
कारने आले हाेते आराेपी
घराफोडी केल्यानंतर टाेळी लगेच उत्तरप्रदेशात कारने निघून जायचे. त्यामुळे दुसèया दिवशी पाेलिसांच्या हाती काहीच सुगावा लागत नव्हता. उत्तरप्रदेशातील ही टाेळी रात्रीच शहराबाहेर पळून जात असल्याने आतापर्यंत पाेलिसांच्या हाती लागली नव्हती. शेवटी पाेलिस उपायुक्त सिंगा ऋषिकेश रेड्डी यांच्या आणि ठाणेदार गाेकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनात पथकाने सीसीटीव्ही ुटेजच्या माध्यमातून आराेपी चाेरीनंतर (यूपी 20 बीडब्ल्यू 3902) क्रमांकाच्या कारमधून पळून जात असल्याचा सुगावा मिळाला. पाेलिसांनी या कारची माहिती काढली असता ती उत्तरप्रदेशातील ग्राम टिबकी, जिल्हा बिजनाैर येथील असल्याचे समजले.
सापळा रचून केली अटक
एमआयडीसी पाेलिसांचे एक पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले. येथे शाेध घेऊन त्यांनी आराेपी शहनवाज अली याच्या घराजवळ सापळा रचला. पाेलिसांची चाहूल लागताच शहनवाज पळायला लागला. पाेलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची कसून चाैकशी केली असता त्याने दिलशाद आणि राजू हिटलर या दाेन साथिदारांची नावे सांगितली. यानंतर पाेलिसांनी या दाेघांनाही ताब्यात घेतले. आराेपींकडून पाेलिसांनी साेन्या-चांदीचे दागिने तसेच चार वाहन असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आराेपींना नागपुरात आणले. या टाेळीने अन्य राज्यातही घरफोडी केल्याची माहिती समाेर आली आहे.