आर्वी,
district-newspaper-sellers-association वृत्तपत्र, ग्रंथ ही वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य निरंतर करीत आहे. मात्र, वृत्तपत्र विक्रेता अद्यापही दुर्लक्षित असून वृत्तपत्र मालक व शासनाने कामगार मंडळांतर्गत सुविधा देऊन, वृत्तपत्र विक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा मदत फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी यांनी केले.

वर्धा जिल्हा वृतपत्र विक्रेता संघटना व सार्वजनिक ग्रामीण वाचनालय सेवाकुंज खुबगाव यांच्या संयुत वतीने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन व वाचन प्रेरणा दिवसानिमित्त पारसे भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. district-newspaper-sellers-association व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, सुरेंद्र पारसे, डॉ. प्रकाश राठी, पत्रकार नंदू गावंडे, डॉ. प्रसन्न बंब यांची उपस्थिती होती. आज वृत्तपत्र व्यवसायाची मोठी उलाढाल असून सुद्धा वृत्तपत्र विक्रेता मात्र दयनिय अवस्थेत जीवन जगत आहे. त्यामुळे यामध्ये बदल घडवून आणण्याकरिता सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकजूट होऊन चळवळ मजबूत करण्याची गरज असल्याचे सुनील पाटणकर म्हणाले. यावेळी डॉ. प्रसन्न बंब, डॉ. प्रकाश राठी, नंदू गावंडे यांनीही मार्गदर्शन केले. सुनील पारसे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गुलाब आचार्य, नाना मुंदरे, बाळा कुलकर्णी, अशोक पवार, सुभाष मोतेवार, शुभांगी पारसे, यशवंत ठाकरे, नरेश शेवडे, प्रकाश कठाणे, मोहन गिरडकर, सुरेश चापले, प्रकाश आकरे, भरत वंजारा, बापूराव रोहणकर, सुरेंद्र पारसे, बंडू जगताप, रूपराव मोरे आदींचा सत्कार करण्यात आला. district-newspaper-sellers-association तसेच वृतपत्र वाटप करणार्यांमध्ये सचिन गायकवाड, धनराज धुळे, अक्षय रहाने यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक ग्रामीण वाचनालयाचे प्रवीण सरोदे यांच्या वतीने राष्ट्रसंतांची ग्रामगीता भेट स्वरूपात देण्यात आली. संचालन बंडू मुळे तर आभार प्रवीण सरोदे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, राजाभाऊ गिरधर, अॅड. मनोहर गुल्हाने, दशरथ जाधव, प्रा. अभय दर्भे, सुशील ठाकूर, सतीश शिरभाते, राजेश सोळंकी, गजानन मसने, अनिल घोटकर, संजय पाटमासे, अजय डोंगरे, सतीश सहारे, सतीश ठाकरे, सचिन चावरे, आदींची उपस्थिती होती.